‘हाय डॉक’ने वाढवले अडीच लाखांनी नेटवर्क | Hi-Dock | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hi-Dock
‘हाय डॉक’ने वाढवले अडीच लाखांनी नेटवर्क

‘हाय डॉक’ने वाढवले अडीच लाखांनी नेटवर्क

पुणे - एखाद्या आजाराबाबत नुकतेच झालेले संशोधन, शस्त्रक्रियेसाठी कोणती नवीन साधने व औषधोपचार उपलब्ध आहेत तसेच रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांना सेकंड ओपिनियन देणाऱ्या येथील ‘हाय डॉक’ या स्टार्टअपने कोरोनाकाळात त्यांचे नेटवर्क अडीच लाखांनी वाढवले आहे.

ॲप्लिकेशनवर आधारित असलेल्या या स्टार्टअपचे एकूण आठ लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून डॉक्टरांना अद्ययावत माहिती आणि रुग्णांना योग्य उपचार मिळणे सोपे होणार आहे. डॉक्‍टरांच्या वैद्यकीय अडचणी सोडविण्यासाठी डॉ. राजेश गादिया आणि वरुण गादिया यांनी पुण्यात २०१९ साली हे स्टार्टअप सुरू केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हे एक वैद्यकीय शिक्षणासंदर्भातील अॅप आहे. हे डॉक्टरांना १५ मिनिटांत पुराव्यावर आधारित वैद्यकीय मत पुरवते.

हेही वाचा: शेतीचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा; जालिंदर कामठे

या बाबत ‘हाय डॉक’च्या वरुण गादिया यांनी सांगितले की, आमच्या वापरकर्त्यांची संख्या आठ लाख १३ हजार झाली आहे. त्यातील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या दर महिन्याला सहा लाख आहे. देशातील प्रत्येक तीन डॉक्टरांपैकी जवळजवळ दोन डॉक्टर हाय डॉकवर नोंदणीकृत आहेत. तर प्रत्येक दोन डॉक्टरांपैकी एक सक्रिय वापरकर्ते आहेत. हा प्लॅटफॉर्म प्रत्येकी दोन सेकंदांनी सेकंड ओपिनियन शोधण्यासाठी आणि सांगण्यासाठी वापरला जातो.

loading image
go to top