विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू

A young man who went for immersion drowned in a mine
A young man who went for immersion drowned in a mine

पुणे : गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाघोलीतील भावडी रस्त्यावर जाधव वस्ती भागातील खाणीमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कृष्णा मारुती लोहकरे (वय 18, रा. वाघोली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा कुटुंबीयांसमवेत मंगळवारी गणपती विसर्जन करण्यासाठी भावडी रस्त्यावरील दगड खाण भागात गेला होता. त्याचे आईवडील खाणीच्या वरील भागात उभे होते तर कृष्णा हा मित्रांसोबत खाणीमधील पाण्यात गणपती विसर्जन करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

हे वाचा - शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य

याबाबतची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षास मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कृष्णाचा मृतदेह शोधून तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. कृष्णाचे वडील हे सुरक्षारक्षक म्हणून एका सोसायटीत काम करतात. येरवडा अग्निशनमनदलाचे अधिकारी सुभाष जाधव आणि त्यांच्या पथकाने शोधकार्य केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com