बजाज ‘सीटी १२५ एक्स’ दुचाकी बाजारात दाखल

दुचाकी आणि तिचाकीच्या क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या ‘बजाज ऑटो’ने ‘सीटी १२५ एक्स’ (CT125X) ही नवीन बाइक बाजारात दाखल
new Bajaj CT 125X launched in India at starting price of Rs 71354 ex-showroom
new Bajaj CT 125X launched in India at starting price of Rs 71354 ex-showroomsakal

पुणे : दुचाकी आणि तिचाकीच्या क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या ‘बजाज ऑटो’ने ‘सीटी १२५ एक्स’ (CT125X) ही नवीन बाइक बाजारात दाखल करत असल्याचे जाहीर केले आहे. ‘हर सडक पर कडक’ या तत्त्वाला अनुसरून साकारलेली ही दुचाकी दरदिवशी लांब पल्ल्याचा प्रवास आणि आव्हानात्मक अनुभवाच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे.

ज्या बाइकस्वारांना संपूर्ण दिवस ती चालवायची असते आणि काहीवेळा फूड डिलिव्हरी, कुरिअरसेवा किंवा व्यापार वितरणासारख्या व्यवसायात त्यावरून सामान न्यायचे असते त्यांच्यासाठी ही दुचाकी आदर्शवत ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे. बजाज ऑटोच्या मोटरसायकल विभागाचे अध्यक्ष सारंग कानडे यांनी दुचाकीबद्दल सांगितले की, ‘सीटी १२५ एक्स’ च्या माध्यमातून आम्ही एक वेगळे उत्पादन ग्राहकांना देत आहोत. ही बाइक उत्तम कामगिरी आणि अतुलनीय टिकाऊपणासह उत्तम मूल्य मिळवून देते. दुचाकीची किंमत अत्यंत किफायतशीर डिस्क आणि ड्रम या दोन्ही प्रकारांमध्ये ती उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com