esakal | Video : एसटीकडून आता शिवनेरीचे पुन्हा नव्याने ब्रँडींग...
sakal

बोलून बातमी शोधा

shivneri bus.jpg

लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांपासून काहीशी दुरावलेली लाल परी पुन्हा जुन्या जोमाने धावावी या उद्देशाने आता एसटीनेही वेगळ्या पध्दतीने मार्केटींगचा प्रयत्न केला आहे.

Video : एसटीकडून आता शिवनेरीचे पुन्हा नव्याने ब्रँडींग...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांपासून काहीशी दुरावलेली लाल परी पुन्हा जुन्या जोमाने धावावी या उद्देशाने आता एसटीनेही वेगळ्या पध्दतीने मार्केटींगचा प्रयत्न केला आहे. एसटीच्या वतीने एक छोटासा व्हिडीओ बनवून तो सर्व प्रवाशांना पाठवला जात असून विकासात एसटीचे योगदान किती महत्त्वाचे असून आजही स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठी एसटी कशी महत्त्वाची आहे, हेच या माध्यमातून प्रवाशांच्या मनावर बिंबवले जात आहे.

 अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

कोरोनामुळे गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर शासनाने निर्बंध आणले आणि त्याचा सर्वाधिक फटका रेल्वे व एसटीला बसला. त्यातही एसटीच्या लाल परीचे चाकच या काळात थंडावल्याने लाखो प्रवाशांची वाहतूकच ठप्प झाली. मात्र आता अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के व आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली आहे. 

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

एसटी पासून काही दिवस दूर राहिलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आता एसटीने एक छोटी व्हिडीओ क्लिप बनवली असून त्या माध्यमातून आजही स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठी एसटी किती महत्वाची आहे, आणि ग्रामीण व शहरी भागाच्या विकासात एसटीचे योगदान कसे आहे याची माहिती याद्वारे दिली गेली आहे. यात प्रामुख्याने शिवनेरी या बसवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनासाठी शासनाने जे निर्बंध घालून दिलेले आहेत, त्याचे पालन केले जाते, प्रत्येक बस आतून व बाहेरून सॅनिटाईज केली जाते, प्रवाशांचेही हात निर्जंतुक केले जातात, एसटीचे चालक वाहक व प्रत्येक प्रवासी मास्क लावतील याची दक्षता घेतली जाते हाही संदेश दिला आहे.