‘इंद्रायणी’वरील नवीन पुलाचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाच्या कामासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. यंत्राच्या साह्याने भूपृष्ठ भागाचे नमुने यंत्राच्या साह्याने बाहेर काढले जात आहेत. नमुन्यात खडक असलेल्या भुपृष्ठ भागाच्या आधारावर पुलाची रचना ठरविण्यात येणार आहे. हा पूल कोणत्या बाजूने होणार आहे, याविषयी अद्याप ठरलेले नाही.

टाकवे बुद्रुक - येथील इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाच्या कामासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. यंत्राच्या साह्याने भूपृष्ठ भागाचे नमुने यंत्राच्या साह्याने बाहेर काढले जात आहेत. नमुन्यात खडक असलेल्या भुपृष्ठ भागाच्या आधारावर पुलाची रचना ठरविण्यात येणार आहे. हा पूल कोणत्या बाजूने होणार आहे, याविषयी अद्याप ठरलेले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, ज्या बाजूने अतिरिक्त जागा हस्तांतरित करण्यात सुलभ होईल, त्या ठिकाणी नवीन पूल होण्याची दाट शक्‍यता आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी नवीन पुलाच्या बांधणीसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकर या पुलाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या धोकादायक पुलाला समांतर पूल तातडीने बांधावा, अशी आंदर मावळवासियांची मागणी आहे. सावित्री नदीवरील पूल पडल्यावर राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. याही पुलाचे ऑडिट झाले होते.

पुणे : विजेचे दिवे लावताना शॉक लागून तिघांचा मृत्यू

हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यावर काही दिवस येऊन अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाली. लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीची पूर्वी या पुलाच्या कामासाठी निधी मिळावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुलाच्या कामाला मंजुरी मिळवून निधी मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. मागील पंधरवड्यात आंबीजवळील पूल पहाटे कोसळल्याने याही पुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. ‘सकाळ’नेही या पुलाच्या रेंगाळलेल्या कामाच्या पाठपुरावा करणाऱ्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत दोन दिवसांपासून येथे सुरू काम पाहता लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Bridge work start on indrayani river