पुणे : विजेचे दिवे लावताना शॉक लागून तिघांचा मृत्यू

Three people die due to shock after lightning in Hinjewadi area pune
Three people die due to shock after lightning in Hinjewadi area pune

हिंजवडी (पुणे) : एमआयडीसी हद्दीतील रस्त्यावर विजेचे दिवे लावत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्प्यात आज (ता. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सागर आयप्पा माशाळकर (वय 20), सागर कूपु पारंडेकर (वय 19) राजू कुपु पारंडेकर (वय 35)  तिघेही रा. बिजलीनगर (चिंचवड) अशी मृतांची नावे आहेत तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे. हा प्रकार भोईर वाडीतील जय गणेश कॉलनीच्या स्मशानभूमीजवळ जाणाऱ्या रस्त्यावर घडला आहे. हे तिघे रस्त्यावर नव्याने लावलेल्या पथदिव्यावर दिवे बसविण्याचें काम करत होते. रोलरसीडी ढकलत असताना वर वीज प्रवाह सुरू असलेल्या विद्युत तारा त्यांच्या लक्षात आल्या नाहीत त्यामुळे लोखंडी सीडीचा स्पर्श तारांना झाल्याने सीडीत वीजपुरवठा उतरल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

हे तिघेही खाजगी कंत्राटदाराची माणसे होती. असे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड यांनी सांगितले आहे. अपघाताची माहिती होताच हिंजवडीचे पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, पोलिस उप-निरीक्षक कविता रुपनर, पोलिस हवालदार दीपक परकाळे, शंकर उतेकर, विनोद मोहिते यांनी घटनास्थळी तत्काळ पंचनामा करून जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत वीज पुरवठा खंडित करून चिटकेलेले मृतदेह बाजूला केले.

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

एमआयडीसीचा निष्काळजी पणा नडला...
दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत असून या प्रकरणात तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी  करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप साठे व संतोष साहेबराव पारखी यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com