पोलिस आयुक्तालय अखेर नव्या इमारतीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) उद्‌घाटन झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून, तसेच कोनशिलेचे अनावरण करून उद्‌घाटन करण्यात आले.

या प्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे उपस्थित होते. 

औपचारिक उद्‌घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाची पाहणी केली. बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्‍तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. आर. के. पद्‌मनाभन यांना पहिले पोलिस आयुक्‍त होण्याचा बहुमान प्राप्त झाला. मात्र, पोलिस आयुक्‍तालयाकरिता स्वतंत्र इमारत नसल्याने ऑटो क्‍लस्टर येथील इमारतीमधून पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार सुरू झाला. पोलिस आयुक्‍तालयाकरिता प्रेमलोक पार्क येथील शाळा, पोलिस मुख्यालयाकरिता निगडी येथील महापालिकेची शाळा, तसेच इतर कार्यालयांकरिता चिंचवडगाव येथील व्यापारी संकुल देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. जून महिन्यात येथील शाळा दळवीनगर येथे स्थलांतरित करण्यात आली. 

आयुक्तालयांतर्गत विविध विभाग सुरू करण्यासाठी चिंचवड, निगडीतील तीन जागांची पालिकेकडे मागणी
  इमारत नूतनीकरणासाठी महापालिकेकडून तीन कोटी ८७ लाख रुपये
  महापालिकेकडून ठेकेदाराला ९ ऑक्‍टोबर २०१८ रोजी वर्कऑर्डर
  इमारतीवर दोन कोटी ८४ लाख रुपये खर्च
  १ जानेवारी रोजी महापालिकेने दिला पोलिसांना आयुक्‍तालय इमारतीचा ताबा

Web Title: new building of Police Commissioner