esakal | येरवडा मनोरूग्णालासाठी नवीन इमारती
sakal

बोलून बातमी शोधा

pune

येरवडा मनोरूग्णालयासाठी नवीन इमारती

sakal_logo
By
प्रशांत पाटील

येरवडा: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयांच्या ब्रिटीशकालीन इमारतींना शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मनोरुग्णालयासाठी पर्यावरणपुरक सुसज्ज नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने चारशे कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यासह ४५० रिक्त पदे भरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री टोपे यांनी गुरूवारी सायंकाळी येरवडा मनोरुग्णालयाला भेटीनंतर बोलत होते. यावेळी आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. संजोग कदम, रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस, उपाधिक्षिका डॉ. गीता कुलकर्णी, परिचारिका, परिचर उपस्थित होते. रुग्णालयातील महिला व पुरूष कक्ष, निरीक्षण कक्ष, उंच वॉर्ड, व्यवसायोपचार कक्षांची पाहणी केल्यानंतर टोपे म्हणाले, ‘‘ राज्यातील ठाणे, येरवडा, नागपूर, रत्नागिरी अशा चार मनोरूग्णालयांच्या विकासासाठी दीडहजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. यापैकी साडेचारशे कोटी रूपयांची तरतूद येरवडा मनोरुग्णालयासाठी केली गेली आहे.

रुग्णालयांच्या इमारतींना शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या मोडकळीस आल्या आहेत. येथील रुग्णक्षमता २५०० आहे. मात्र येथे इमारती मोडकळीस आल्यामुळे केवळ १ हजार रुग्ण ठेवता येते. त्यासाठी मनोरूग्णालयाच्या इमारती चांगल्या प्रकारे बांधण्यात येणार आहेत. येथील स्वयंपाकगृहापासून इतर सोई सुविधा, व्यवसायोपचार केंद्र, पुनर्वसन केंद्र आदी सुसज्ज बांधण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपकरणे, यंत्रसामुग्री सुध्दा खरेदी केली जाणार आहे.’’

हेही वाचा: अनिल देशमुख चौकशी अहवालात छेडछाड प्रकरणी CBI कडून एक जण ताब्यात

मनोरुग्णालयातील पदसंख्या हजार आहे. मात्र रुग्णालयातील डाॅक्टरपासून ते परिचारिकांपर्यंतची साडेचारशे रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. डे केअर सेंटर, हाफवे होम, सेंटर फॉर अेक्सलन्स असे विभाग नव्याने बांधण्यात येणार आहेत. रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यासाठी समितीची स्थापना केली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्रयांनी साधला रुग्णांशी संवाद

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महिला व पुरूष कक्षाला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. तुम्ही कसे आहात, तुमचा दिनक्रम कसा असतो, रुग्णालयात तुम्हाला कसे वाटते, बाहेर जावेसे वाटते का असे प्रश्‍न त्यांनी रुग्णांना विचारले. रुग्णांचे पुनर्वसन व व्यवसायोपचार विभाग आवश्‍यक असल्याचे डाॅ. फडणीस यांनी टोपे यांना सांगितले.

loading image
go to top