esakal | अनिल देशमुख चौकशी अहवालात छेडछाड प्रकरणी CBI कडून एक जण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

अनिल देशमुख चौकशी अहवालात छेडछाड प्रकरणी CBI कडून एक जण ताब्यात

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुली प्रकरणाच्या चौकशी अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी एका व्यक्तीला CBIनं बुधवारी ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती देशमुख यांच्या लीगल टीममधील असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई विमानतळाबाहेरुन या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याच्या बातम्या २९ ऑगस्ट रोजी माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा हा प्राथमिक अहवाल लीक झाल्यानं त्यावरुन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या चौकशी अहवालात असं म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही." यासंदर्भात क्लीनचीटच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयनं याचा इन्कार केला होता. तसेच याची चौकशी सुरु केली होती. याप्रकरणाच्या चौकशीअंती हे दिसून आलं की, देशमुख यांच्या लीगल टीमने सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: पुणे : 'शंखनाद' महागात! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

या लाच प्रकरणात समावेश असलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही सीबीआयनं म्हटलं आहे. या कागदपत्रांच्या छेडछेडीच्या कारस्थानात आणखी कोण कोण सामिल होतं, याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं, या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना त्यांनी एपीआय सचिन वाझे यांच्याकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा: अनिल देशमुखांच्या जावयाची CBIकडून वीस मिनिटं चौकशी अन् सुटका

दरम्यान, ११ मे रोजी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी सीबीआयनं याप्रकरणी देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल करुन त्यांच्या चार ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कलम ७ तसेच गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

loading image
go to top