पुणे जिल्ह्यातील 104 अंगणवाड्यांना मिळणार नविन इमारती

संतोष आटोळे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

शिर्सुफळ - पुणे जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षापासुन हक्कची इमारत नसलेल्या किंवा दुरावस्था झालेल्या अंगणवाड्यांच्या प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत जिल्ह्यातील 104 अंगणवाडीच्या नविन इमारतींच्या साठी 6 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीतील मुलांना गेल्या काही वर्षापासुन जिर्ण झालेल्या, दुरावस्था झालेल्या इमारतीमध्ये शिक्षणाचे प्राथमिक धेड गिरवावे लागत आहेत.तर काही ठिकाणी मंदिरे किंवा खाजगी ठिकाणी अंगणवाडीची मुले बसविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमिवर पुणे जिल्हा परिषेदच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंर्तगत 104 अंगणवाड्याच्या इमारत दुरुस्तीसाठी 6 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहेत. यामुळे याभागातील अंगणवाड्यांच्या इमारतींचा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यामध्ये वेल्हा वगळता उर्वरित बारामती तालुक्यातील अंगणवाड्यांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक 15 अंगणवाड्या या खेड तालुक्यातील आहेत.तर मुळशी मधील फक्त एक अंगणवाडी आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार अजित पवार यांच्या सुचनेप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या माध्यमातुन निधी उपलब्ध झाला आहे.यामुळे अंगणवाडीमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा  देण्यास मदत होणार आहे.
शारदा खराडे (उपसभापती पंचायत समिती बारामती)

अंगणवाडी नविन इमारत मंजुर झालेला तालुका व संख्या खालीलप्रमाणे  
1) आंबेगाव - 6
2) खेड - 15
3) जुन्नर - 12
4) मावळ - 6
5) मुळशी - 1
6) भोर - 7
7) शिरूर - 9
8) हवेली - 5
9) पुरंदर - 4
10) दौंड - 12
11) इंदापुर - 13
12) बारामती 14
एकूण  -104

Web Title: New buildings will be available in 104 Anganwadis in Pune district