

New Chhatrapati Sambhajinagar Pune Highway Map Viral Land Purchase Race Begins
Esakal
छत्रपती संभाजीनगर ते पुणे या दरम्यान नवा महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाचा नकाशा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, एक धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. नव्या महामार्गाचा जो नकाशा व्हायरल होतोय त्या भागात जमीन खरेदीसाठी व्यावसायिक आणि श्रीमंतांकडून लगबग सुरू आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना महामार्गाची माहिती नसल्यानं कवडीमोल भावानं या जमिनींचे व्यवहार होत आहेत.