पुणे जिल्ह्यात ३८५६, शहरात १६५८ नव्या कोरोना रुग्णांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच आजच्या रुग्णांत पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८०८, नगरपालिका क्षेत्रातील २३२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ८१ रुग्णांचा समावेश आहे.

पुणे  : पुणे जिल्ह्यात आज (ता.३०) ३ हजार ८५६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ६८ हजार ३८१ झाली आहे. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६५८ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी ३१४  रुग्ण कमी झाले आहेत. शनिवारी हाच आकडा ४ हजार ७० इतका होता. 

करु का अजितदादांना फोन; प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण
 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच आजच्या रुग्णांत पिंपरी-चिंचवडमधील १ हजार ७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८०८, नगरपालिका क्षेत्रातील २३२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ८१ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये  पुणे शहरातील सर्वाधिक ३५ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १४, जिल्हा परिषद क्षेत्रातील १९, नगरपालिका १ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील चार रुग्ण आहेत. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. २९) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. ३०) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आज अखेरपर्यंतच्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २९ हजार ६२९ तर रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४ हजार ६१ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये  पुणे जिल्ह्याबाहेरील ११६ रुग्ण आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new corona 3856 patients Found In Pune district and 1658 people in the city