Pune News : नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

नागालँडच्या दुर्गम डोंगररांगांतील धबधब्यांच्या सान्निध्यात बेडकाची एक नवी प्रजाती सापडली असून, या महत्त्वपूर्ण शोधामुळे ईशान्य भारताच्या जैवविविधतेतील आणखी एक गूढ उलगडले आहे.
New Frog Species Discovered in Nagaland

New Frog Species Discovered in Nagaland

sakal

Updated on

पुणे - नागालँडच्या दुर्गम डोंगररांगांतील धबधब्यांच्या सान्निध्यात बेडकाची एक नवी प्रजाती सापडली असून, या महत्त्वपूर्ण शोधामुळे ईशान्य भारताच्या जैवविविधतेतील आणखी एक गूढ उलगडले आहे. ‘अमोलॉप्स कमला’ असे या नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले असून, ईशान्य भारतातील समृद्ध आणि अद्याप पूर्णपणे अभ्यास न झालेल्या जैवविविधतेवर या संशोधनामुळे नवा प्रकाश पडला आहे. विशेष म्हणजे, या संशोधनात पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. के. पी. दिनेश यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com