पुण्यात स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजपविरोधात नवी आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

राज्यापाठोपाठ महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने चालविला आहे. त्यातून महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनची साथ घेतली. त्यापाठोपाठ आता स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडणुकीतही भाजपला विरोध करण्याची भूमिका नव्या आघाडीने घेतला.

पुणे : महापालिकेतील स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात इतर राजकीय पक्षांनी पुन्हा आघाडी उभारली असून, या पदासाठी भाजपच्या हेमंत रासने यांच्याविरोधात नव्या आघाडीतर्फे अशोक कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. येत्या शुक्रवारी (ता.13) निवडणूक होणार आहे. 

नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार

राज्यापाठोपाठ महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने चालविला आहे. त्यातून महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने शिवसेनची साथ घेतली. त्यापाठोपाठ आता स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निवडणुकीतही भाजपला विरोध करण्याची भूमिका नव्या आघाडीने घेतला. स्थायीचे अध्यक्षपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट असूनही नव्या आघाडीकडून कांबळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

शस्त्रासह पोलिस अधिक्षकांचा फोटो व्हायरल; कारवाई होणार?

दरम्यान, रासने यांनीही सोमवारी आपला अर्ज दाखल केला. स्थायी समितीतील पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या रासने यांच्या निवडीची ही केवळ औपचारिकता राहिली. महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक प्रक्रिया होईल.

 पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New front is against the BJP for the chairmanship of Standing at PMC