esakal | नव्या गोठ्यांमुळे वाढणार २ लाख झाडे; अनुदान घेण्यासाठी झाडे लावणं सक्तीचं!
sakal

बोलून बातमी शोधा

Cow

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात येणाऱ्या गोठ्यांमुळे पुणे जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ३५० नवीन झाडांची लागवड होणार आहे. या योजनेंतर्गत गोठ्यासाठी अनुदान घेण्यासाठी झाडे लावणे अनिवार्य आहे. यासाठी एक गोठा पन्नास झाडे असे सूत्र अवलंबले जात आहे.

नव्या गोठ्यांमुळे वाढणार २ लाख झाडे; अनुदान घेण्यासाठी झाडे लावणं सक्तीचं!

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात येणाऱ्या गोठ्यांमुळे पुणे जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ३५० नवीन झाडांची लागवड होणार आहे. या योजनेंतर्गत गोठ्यासाठी अनुदान घेण्यासाठी झाडे लावणे अनिवार्य आहे. यासाठी एक गोठा पन्नास झाडे असे सूत्र अवलंबले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केवळ दोनच महिन्यांत जिल्ह्यातील ३ हजार ८६७ शेतकऱ्यांनी प्रत्येकी एका गोठ्याची मागणी केली आहे. यामुळे एवढे नवे गोठे रोजगार हमी योजनेतून उभारले जाणार आहेत. यासाठी पंचायत समिती स्तरांवर इच्छूक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक २ हजार ६९० प्रस्ताव एकट्या इंदापूर तालुक्यातून तर,  सर्वात कमी म्हणजेच केवळ दोन प्रस्ताव खेड तालुक्यातून प्राप्त झाले आहेत. 

बारामतीकरांनो सावधान, आता कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका 

या सर्व गोठ्यांना प्रत्येकी ७० हजार रुपयांचा निधी रोजगार हमी योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांसाठी मागेल त्याला गोठा देण्यासाठी हरघर गोठे, घरघर गोठे ही योजना १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गोठ्यांना रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे गोठाही मिळेल आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  रोजगारही उपलब्ध होऊ शकेल, हा उद्देश ठेवण्यात आला आहे.

पुणे झेडपीच्या अध्यक्षा कडाडल्या, ठेकेदारांना दिला हा इशारा

सध्या राज्यात केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राज्य पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. गाई-म्हशींच्या गोठ्याचे शेड बांधण्यासाठी राज्य पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. याला आता केंद्र पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून गोठ्यात सिमेंट क्राॅंक्रिटचे पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी यासाठी आणि आणखी प्रत्येकी ३५ हजार रुपये, याप्रमाणे प्रत्येकी ७० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही खुप उपयुक्त योजना आहे. यामुळे नवीन गोठा आणि झाडे लावण्याचा दुहेरी फायदा मिळणार आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. इच्छुकांनी मागणी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे.
- डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

तालुकानिहाय नव्या गोठ्यांचे प्रस्ताव
बारामती - ३०, हवेली -४०,  जुन्नर - ७४, मुळशी- ५८,  इंदापूर - २ हजार ६९०, मावळ - ७०, आंबेगाव - ४०,   वेल्हे - ४, भोर - ४५६, खेड - दोन, शिरूर - २१२, पुरंदर - १४५, दौंड - ४६.

Edited By - Prashant Patil