पुणे झेडपीच्या अध्यक्षा कडाडल्या, ठेकेदारांना दिला हा इशारा

NIRMALA PANSARE
NIRMALA PANSARE

कडूस (पुणे)  : कामांसाठी ग्रामस्थांनी आग्रह धरावा. पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देणार, पण कामाच्या क्वालिटीबाबत कॉम्प्रमाईज नको. तालुक्यात वीस- पंचवीस टक्के बिलोने कामे घेतली जात आहेत. निकृष्ट काम होत असेल, तर ग्रामस्थांनी ते थांबवले पाहिजे. दर्जेदार काम करून घ्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले.

कडूस (ता. खेड) येथे राज्य शासनाच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखाना, कर्मचारी निवासस्थानासह कंपाउंडच्या बांधकामासाठी शासनाकडून 64 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी (ता. 9) जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी पंचायत समितीच्या उपसभापती ज्योती अरगडे, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, नंदा सुकाळे, 'राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, अशोक शेंडे, प्रताप ढमाले, पंडित मोढवे, निवृत्ती नेहेरे, दामोदर बंदावणे, मारुती जाधव, अँड अरुण मुळूक, किसन नेहेरे, पशुसंवर्धनचे सहआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, के. के. कोहिनकर, राम जाधव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब माने, अप्पासाहेब खंडागळे व ग्रामस्थ उपस्थित होते. चांगदेव ढमाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. लहू पोखरकर यांनी आभार मानले.

हे काम ठेकेदाराने वीस टक्के कमी (बिलो) दराने घेतले आहे. हाच धागा पकडून पानसरे म्हणाल्या की, या वर्षी एखादे काम झाले की पुढच्या वर्षी त्याच कामाचा दुरुस्तीचा प्रस्ताव येत असतो. हा प्रकार बंद झाला पाहिजे. गावातील विकास कामे सारखी सारखी होत नसतात. त्याला एकदाच पैसा मिळतो. त्याचा योग्य वापर व्हायला हवा. कामांच्या ऑनलाइन निविदा निघत असतात. कमी दराने कामे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ठेकेदाराने काम चांगल्या प्रतीचे केले पाहिजे. 

ग्रामस्थांनी सुद्धा काम दर्जेदार करून घेण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. निकृष्ट काम होत असेल, तर फक्त तक्रार करून चालणार नाही. ते कसे दर्जेदार कसे होईल, याकडे लक्ष द्या.
 - निर्मला पानसरे
अध्यक्षा,  जिल्हा परिषद पुणे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com