स्टॅच्यु ऑफ युनिटीमुळे गुजरातमध्ये पर्यटनाच्या नव्या संधी : कमलेश पटेल 

प्रविण कुंठे
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

पुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू राहिल्यास 2020 पर्यंत वर्षाला साडेसात कोटी पर्यटक गुजरात मध्ये येतील अशी आशा आहे.'' , असे मत 'टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड'चे चेअरमन' कमलेश पटेल यांनी व्यक्त केले. 

पुणे : ''दहा वर्षापूर्वी गुजरातमध्ये वर्षाला 60 लाख पर्यटक येत होते. आता साडेपाच कोटी पर्यंत हा आकडा गुजरातने पार केला आहे. हे असेच चालू राहिल्यास 2020 पर्यंत वर्षाला साडेसात कोटी पर्यटक गुजरात मध्ये येतील अशी आशा आहे.'' , असे मत 'टुरिझम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात लिमिटेड'चे चेअरमन' कमलेश पटेल यांनी व्यक्त केले. 

गुजरात टुरिझम'च्यावतीने 'हॉटेल शेरटन ग्रॅंड' येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' च्या उद्घाटनानंतर महिन्याभरातच गुजरात मध्ये पर्यटनाच्या किती संधी निर्माण झाल्या याची माहिती देण्यासाठी पटेल पुण्यात आले होते. यावेळी गुजरात 'टुरिझम'चे उपव्यवस्थापक सनातन पांचोली, 'टेन्ट सिटी'चे प्रतिनिधी युवराज चौधरी, दिलीप सिन्हा आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

पटेल म्हणाले, ''पूर्वी पर्यटनामधून गुजरातला केवळ 20 कोटींचा नफा मिळायचा. तोच आता वाढून 80 कोटी रुपये झाला आहे. गुजरातमध्ये नैसर्गिक सौंदर्य संपत्ती खूप आहे. एकाच वेळी संपूर्ण गुजरात पाहणे शक्‍य नाही. त्यात स्टॅच्यु ऑफ युनिटी मुळे पर्यटनाच्या संधी आणखी वाढल्या आहेत. टेंट सिटीच्या माध्यमातून नर्मदेचा अभिनव अनुभव घेता यावा यासाठी पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा निर्माण केल्या आहेत. दहा वर्षापुर्वी पर्यटनाच्या नकाशात गुजरात कुठेच नव्हते. पण आज सर्वात आग्रेसर आहे. यासाठी पर्यटकांच्या आवडीनुसार पर्यटानाची व्यवस्था केली आहे.'' यावेळी उपव्यवस्थापक पांचोली यांनी संपूर्ण गुजरात मधील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती दिली. 

विशेष आकर्षण 
- स्टॅच्यु ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा 
- सरदार सरोवर धरण 
- टेंट सिटी नर्मदा 
- व्ह्यूविंग गॅलरी 153 मीटर छातीच्या उंचीवर एकावेळी 200 पर्यटकांना समावून घेते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New opportunities for tourism in Gujarat due to the Statue of Unity : Kamlesh Patel