शेवाळेवाडी एसटीचा विनंती थांबा
मांजरी : शेवाळेवाडी येथील शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या प्रयत्नामुळे येथील बसडेपोच्या परिसरात एस.टी. बसचा विनंती थांबा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातून बाहेर सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आदी परिसरात एस.टीने जा-ये करणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.

पुर्वेकडून एसटीने शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, एसटीतून उतरल्यानंतर शहराच्या विविध भागात राहणाऱ्या प्रवाशांना बस मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. शेवाळेवाडी येथील शिवशंभो ज्येष्ठ नागरिक संघांने ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यमार्ग परिवहन मंडळ कार्यालयाकडे या परिसरात विनंती थांब्याची चार महिन्यापूर्वी मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून संघाने विनंती थांब्यास मान्यता मिळविण्यात यश मिळविले आहे. संघाचे मार्गदर्शक माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे यांच्या हस्ते नुकतेच या विनंती थांब्याचे उद्घाटन झाले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जे. एन. शहा, उपाध्यक्षा एच. सी. पडवळकर, सचिव सी. डी. उमरदंड, कोशाध्यक्ष एस. बी. शेवाळे, कलावती जगताप, जी. डी. पंडीत, एस. डी. शेवाळे, रामचंद्र शेवाळे, एम. टी. देसाई, एस. जी. कोद्रे, आर. डी. शेवाळे, आशा ढोरे, एच. के. मोहे, व्ही. जी. शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष शहा म्हणाले, "या ठिकाणी पीएमपीएलचा बस डेपो आहे. शहराच्या विविध भागात येथून बस मार्गस्थ होत असतात. त्यामुळे एस.टी. बसमधून येणाऱ्या प्रवाशांना थेट जाग्यावरून शहरांतर्गत प्रवासाला बसता येणार आहे. त्यासाठी आम्ही ज्येष्ठांनी विनंती थांब्याची मागणी केली होती. तो सुरू झाल्यामुळे एसटीने बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना चांगली मदत झाली आहे.''