kurvandi
kurvandi

तरुणाईसाठी नवे पर्यटन डेस्टिनेशन "कुरवंडी घाट'

सातगाव पठार (पुणे) : हिरव्यागार वनराईने नटलेले डोंगर, खोल खोल दऱ्या, तलाव, थंड वारा असा सगळा मन प्रसन्न करणारा परिसर कुरवंडी घाटात अनुभवायला मिळत आहे. या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले कुरवंडी घाटाकडे वळत आहेत. तरुणाईला आता एक नवीन आणि जवळचे ठिकाण साद घालत आहे.

पेठ-कुरवंडी-घोडेगाव (ता. आंबेगाव) या मार्गावर असलेल्या कुरवंडी घाटातील कोटमदरा तलाव हा सततच्या पावसाने पूर्ण भरला आहे. या कुरवंडी घाटात तीव्र उतार आणि वेडीवाकडी वळणे आहेत. निसर्गाने या परिसराला भरभरून दिले आहे. मुक्त हस्ताने निसर्गाने केलेली उधळण पाहण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

या भागात पावसाने नुकतीच विश्रांती घेतली आहे. मात्र, गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे या परिसरातील सर्व डोंगररांगा या हिरव्यागार झालेल्या आहेत, असे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक जण पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. ते ठिकाण म्हणजे कुरवंडी घाट परिसर आणि येथे असणारे पाण्याचे तलाव तसेच डोंगरावर असलेले वेळेश्वराचे पुरातन मंदिर. वेळेश्वर मंदिराशेजारी असलेल्या विहिरीचे थंडगार पाणी पिण्याची मजा काही औरच, असे भाविक आवर्जून सांगतात.

कोटमदरा तलावातील पाणीसाठा यंदाच्या उन्हाळ्यात संपुष्टात आला होता. मात्र, यंदा सतत चालू असलेल्या पावसाने तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली असून तो आता पूर्ण क्षमतेने भरला आहे. कुरवंडी घाटातून प्रवास करताना कोटमदरा तलावाचे, हिरव्यागार वनराईचे सौंदर्य आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी प्रवासी घाटात दोन मिनिटे का होईना थांबत आहेत.

चांगला पर्याय उपलब्ध
आजकालच्या तरुणांना फोटोसेशनचे खूप वेड लागले आहे. फोटोसेशन करण्यासाठी ही मुले सतत नवीन ठिकाण शोधत असतात. त्यांना आता या कुरवंडी घाटाचा तसेच वेळेश्वर मंदिर परिसराचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे ठिकाण तरुणाईचे आवडते ठिकाण झाल्याशिवाय राहणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com