ब्रेक टेस्टिंगसाठी महिनाभरात नवा ट्रॅक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

अत्याधुनिक पद्धतीने जड वाहनांची होणार तपासणी; यशदाच्या धर्तीवर प्रशिक्षण

पुणे - सासवड येथील दिवे गावात उभारण्यात येणाऱ्या वाहनांच्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकचे काम वेगाने सुरू असून, येत्या महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर येथे जड वाहनांची तपासणी आणि पासिंगचे काम अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे. भविष्यात या ठिकाणी ‘यशदा’च्या धर्तीवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारण्याचा प्रयत्न ‘आरटीओ’कडून सुरू करण्यात आला आहे. 

आरटीओमध्ये वाहनांच्या पासिंगदरम्यान ब्रेक टेस्ट योग्य प्रकारे घेतली जात नाही. या संदर्भात श्रीकांत कर्वे यांनी महाराष्ट्र सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाहनांच्या पासिंगदरम्यान केल्या जाणाऱ्या ब्रेक टेस्टसाठी स्वतंत्र ट्रॅक असावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच स्वतंत्र ट्रॅक नसलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये पासिंगचे कामकाज थांबविण्यात यावे, अशी सूचनाही दिल्या आहेत.

त्यानंतर परिवहन कार्यालयाने न्यायालयाकडून मुदतवाढ घेऊन, ट्रॅक उभारण्याचे आदेश आरटीओंना दिले. त्यामुळे राज्यभरातील आरटीओमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. पुणे आरटीओने त्यासाठी सासवड येथील जागेवर ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला. 

त्या ठिकाणी वाहनांच्या पासिंगसाठी आणि ब्रेक टेस्टसाठी २०० मीटरचा स्वतंत्र ट्रॅक उभारण्यासाठी राज्य सरकारने सात कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यातून सासवड येथील दिवे येथे २५ एकर जागेवर ट्रॅक उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. लवकरच येथे वाहनांच्या टेस्ट सुरू होतील, अशी अपेक्षा प्रादेशिक परिवहन 
अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी व्यक्त केली. 

टेस्ट ट्रॅकसाठी तरतूद  
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्यातील प्रत्येक आरटीओत २५६० मीटरचा स्वतंत्र ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्यासाठी एक लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या परिवहन कार्यालयांच्या ठिकाणी हे ट्रॅक उभारण्याच्या निविदा प्रक्रियेसाठी आकस्मित निधीतून ८४ लाख ७८ हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

Web Title: new track for break testing