esakal | कोरोनामुळे रोबोटीक शस्त्रक्रियेचा नवा ट्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

New trend in robotic surgery due to corona

हार्निया शल्यचिकित्सक डॉ. परेश गांधी म्हणाले, "रोबोटिक शस्त्रक्रिया हे मल्टिपल हार्नियाच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. त्यातून रुग्णसेवेची गुणवत्ता निश्‍चित वाढते.''

कोरोनामुळे रोबोटीक शस्त्रक्रियेचा नवा ट्रेंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : आमच्या दोघांनाही पोटदुखीचा प्रचंड त्रास होता. बारा-चौदा महिन्यांपासून या वेदना सहन करत होतो. पोटात दुखायला लागले की गोळ्या, इंजेक्‍शन घ्यायचे आणि वेदना कमी करायच्या, हे आमचं नेहमीचं झालेलं. पण, एक दिवशी औषध घेऊनही पोटात दुखायचे थांबत नव्हतं...इस्माइल शेख आणि त्यांच्या पत्नी नसीर बोलत होत्या. त्यांच्यावर अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित रोबोटीक शस्त्रक्रिया झाली आणि वेदना कायमच्या बंद झाल्या. आमची शस्त्रक्रिया झालीय असं वाटतंच नाही. हे नवीन आयुष्य आम्हाला डॉक्‍टरांनी दिलंय, हे बोलताना त्यांचा कंठ दाटून येतो.

"आमच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हतेच. त्यामुळे महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय गाठले. तेथील डॉक्‍टरांनी दोघांनाही तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तेथील डॉक्‍टरांच्या मदतीनेच आम्हाला हिलिंग हॅंड्‌स क्‍लिनिकचा मार्ग दाखवला,'' असेही शेख दांपत्यांनी सांगितले.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

या शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना हिलिंग हॅंड्‌स क्‍लिनिकचे संचालक डॉ. अश्‍विन पोरवाल म्हणाले, "दुर्बिणीतून होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये गॅस वापरला जातो. तो रुग्णाच्या शरीरात जातो आणि पुन्हा बाहेरदेखील निघतो. पण, यात डॉक्‍टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला पूर्ण भूल द्यावी लागते. त्यामुळे भूलतज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक यांना कोरोनाच्या संसर्गाचा जास्त धोका असतो. यातून मार्ग काढण्यासाठी रोबोटीक लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा नवा कल निर्माण झाला आहे.''

हार्निया शल्यचिकित्सक डॉ. परेश गांधी म्हणाले, "रोबोटिक शस्त्रक्रिया हे मल्टिपल हार्नियाच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. त्यातून रुग्णसेवेची गुणवत्ता निश्‍चित वाढते.''

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

अशी होते रोबोटीक सर्जरी

- रुग्ण शस्त्रक्रिया कक्षात असतो. त्याच्या जवळच्या स्वतंत्र खोलीत डॉक्‍टर बसलेले असतात. त्यांच्या हातात शस्त्रक्रिया कक्षातील रोबोटचे सर्व नियंत्रण असते. डॉक्‍टर संगणकाच्या पडद्यावर बघून शस्त्रक्रिया करत असतात. डॉक्‍टरांनी संगणकाच्या माध्यमातून दिलेल्या सूचनेनुसार रोबोट रुग्णावर शस्त्रक्रिया करत असतो. त्यामुळे डॉक्‍टरांना जंतूसंसर्गाचा धोका कमी असतो.

रुग्णाला होणारे फायदे
-शस्त्रक्रिया अचूक होते
-रक्तस्राव कमी
-रुग्ण लवकर घरी जातो
-मानवी त्रुटी टाळता येतात


अखेर रवींद्र बऱ्हाटे फरारी म्हणून घोषित; बऱ्हाटेविषयी माहिती देण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन​

''लॉकडाउनच्या काळात पित्ताशयाच्या पिशवीतील खडे, हार्निया, गर्भाशयाची शस्त्रक्रिया यांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. या सर्व शस्त्रक्रिया आता रोबोटच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.''
-डॉ. अश्‍विन पोरवाल, संचालक, हिलिंग हॅंड्‌स क्‍लिनिक
 

loading image
go to top