Loksabha 2019 : देशाच्या विकासासाठी आम्ही केले मतदान

Loksabha 2019 : देशाच्या विकासासाठी आम्ही केले मतदान

पुणे - ‘‘देशात पुण्याचा नावलौकिक आहेच, परंतु त्यात भर पडावी म्हणून निश्‍चितच पुण्याच्या खासदाराने प्रयत्न करावेत. मतदानाचा हक्क तर आम्ही बजावलाच आहे. आता अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे,’’ अशा परखड शब्दांत नवमतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘‘आम्ही बोटावर शाई लागावी म्हणून आलो नाही. तर, उमेदवारांनी तरुणाईच्या अपेक्षा पूर्तीसाठी पाऊल उचलावे, असे तरुणांचे म्हणणे आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात शिकणारी निकिता कुलकर्णी पहिल्यांदाच मतदान करत होती. ती प्रचंड उत्सुक दिसत होती. ‘‘पहिल्या मतदानाचा उत्साह आहेच. परंतु, निवडून येणाऱ्या उमेदवाराने महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक काम करावे, असे वाटते. पुण्यात मुलींना अधिकाधिक सुरक्षित वाटावे, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे’’ असेही निकिताने अधोरेखित केले.शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, औंध, पौड रस्ता, कोथरूड, बिबवेवाडी, भवानी पेठ अशा विविध परिसरातील नवमतदारांशी संवाद साधला असता, मेट्रो, वाहतूक अशा विविध विषयांवर काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी मतदानानंतर व्यक्त केली.

रोहित पांडे : देशाला अधिकाधिक प्रबळ बनविण्यासाठी मी पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावला. पहिल्या मतदानाविषयी उत्सुक होतो. मतदान केल्याचा अभिमान वाटत आहे.

श्रद्धा अंकोलीकर : आतापर्यंत मतदानाची सगळी प्रक्रिया लांबून पाहत आले आहे. पण, लोकशाहीचा भाग होताना वेगळीच उत्सुकता होती. त्याबरोबरच आपल्यावर जबाबदारी आली आहे, याचेही भान आले.

सनत गडगे : पक्षाने वचने पूर्ण करावीत. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कडक नियम लागू करावेत. वाहनतळ समस्या सुटण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

वैष्णवी मोरे : खासदारांनी शहरात महिला सुरक्षेविषयी जागरूक राहायला हवे. कितीही सोयीसुविधा असल्या, तरी तरुणींना रात्री-अपरात्री बाहेर पडता येत नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना कराव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com