न्यूझीलंडच्या आचाऱ्याला आयुर्वेदिक आहाराची गोडी

न्यूझीलंडच्या आचाऱ्याला आयुर्वेदिक आहाराची गोडी लागली आहे. आयुर्वेदिक आहार शास्त्राचा अभ्यास करून त्या आधारावर नवीन चविष्ट पदार्थ तयार करण्याचा संशोधन प्रकल्प या आचाऱ्याने हाती घेतला आहे.
james pulham
james pulhamsakal
Summary

न्यूझीलंडच्या आचाऱ्याला आयुर्वेदिक आहाराची गोडी लागली आहे. आयुर्वेदिक आहार शास्त्राचा अभ्यास करून त्या आधारावर नवीन चविष्ट पदार्थ तयार करण्याचा संशोधन प्रकल्प या आचाऱ्याने हाती घेतला आहे.

पुणे - न्यूझीलंडच्या आचाऱ्याला आयुर्वेदिक आहाराची गोडी लागली आहे. आयुर्वेदिक आहार शास्त्राचा अभ्यास करून त्या आधारावर नवीन चविष्ट पदार्थ तयार करण्याचा संशोधन प्रकल्प या आचाऱ्याने हाती घेतला आहे.

जेम्स पुलहॅम, असे या आचाराचे नाव असून ते न्यूझीलंडचे आहेत. ‘एनझेडएमए’ संस्थेमध्ये पाकक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. पुण्यात येऊन त्यांनी येथील आयुर्वेदाची माहिती घेतली. शिरोधारासारखे आयुर्वेदीय उपचार केले. पण, त्यांना खरा आश्चर्याचा धक्का बसला तो नाडीपरीक्षणातून! ‘तुम्हाला लहानपणी श्वसनाचा विकार झाला होता,’ अशी माहिती वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी त्यांना दिली. त्यावर ते आश्चर्यचकित झाले. ‘मला वयाच्या आठव्या-दहाव्या वर्षी क्षयरोग झाला, हे तुम्हाला आता कसे समजले. त्यावेळी उपचार करून तो पूर्णतः बरा झाला होता,’ असे त्यांनी सांगितले. यातून त्यांची आयुर्वेदाबद्दलची जिज्ञासा जागी झाली. त्यानंतर त्यांना आयुर्वेदातील योगशास्त्र, आहारशास्त्र, जीवनशैली याचे आकर्षण वाढले.

सरदेशमुख यांच्याकडे आयुर्वेदिक आहाराशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे पदार्थांचे संशोधन करून न्यूझीलंडच्या खवैय्यांपर्यंत हे पदार्थ घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुर्वेदाबद्दल जेम्स यांचा दृष्टिकोन...

  • आहाराशी संबंधित सिद्धान्ताचा अभ्यास करण्यास प्राधान्य

  • मसाले भारताचे वैशिष्ट्य असून त्याचा वापराच्या संशोधनावर भर

  • ताज्या पालेभाज्या, फळभाज्यांचा वापर करून न्यूझीलंडच्या नागरिकांना आवडतील अशा पदार्थांची निर्मिती करणार

  • न्यूझीलंडमध्ये आयुर्वेदिक आरोग्याविषयी स्वतंत्र दालन उभाणार

आयुर्वेदिक आहार

राजसी, सात्त्विक, तामसी असे आहाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातही नैवेद्य आणि प्रसाद या संकल्पनांमुळे आहाराला एक प्रकारचे आध्यात्मिक कोंदण मिळाले. याच आहारशास्त्राकडे आता सगळे जग आकर्षित होत आहेत.

निसर्ग हा सगळ्यात मोठा आहे. आयुर्वेदाने मानवाच्या जीवनात निसर्गाला केंद्रस्थानी ठेवले आहे. मी पाकशास्त्रात निपुण असल्याने आयुर्वेदाने सांगितलेल्या आहारशास्त्रावर आता अभ्यास करत आहे.

- जेम्स पुलहॅम

आयुर्वेदामध्ये अग्नी आणि सप्तधातू याला सर्वाधिक महत्त्व आहे. संपूर्ण शरीराचे पोषण हे यावर अवलंबून असते. आयुर्वेदिक ग्रंथात रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या प्रत्येक धातूला आहारातून पोषण मिळते. त्यामुळे चौरस आणि समतोल आहार महत्त्वाचा असतो. हे भारतीय आयुर्वेदशास्त्र आता परदेशातही पोहोचले आहे.

- वैद्य सुकुमार सरदेशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com