esakal | धक्कादायक! नसरापूरला स्वच्छतागृहात आढळले नवजात अर्भक
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! नसरापूरला स्वच्छतागृहात आढळले नवजात अर्भक

धक्कादायक! नसरापूरला स्वच्छतागृहात आढळले नवजात अर्भक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नसरापूर: मुख्य रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक आढळले. नसरापूर येथील एक महिला व्यापारी सोमवारी (ता. ६) दुपारी तीन वाजता स्वच्छतागृहात गेली असता तिथे एक नवजात अर्भक रडत पडल्याचे दिसताच तिने सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झोरे व विजय जंगम यांना माहिती दिली.

हेही वाचा: कुत्र्याचा राग मालकावर; कारची काच फोडून ४४ हजार लंपास

अर्भक जिवंत असल्याने त्यांनी तातडीने नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व राजगड पोलिस ठाण्यात या बाबत माहिती दिली. आरोग्य केंद्राचे डॉ. जयदीप कापशीकर व परिचारिकेने तातडीने धाव घेऊन अर्भकाला ताब्यात घेऊन आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. पोलिस कर्मचारी संतोष तोडकर व मुकुल गायकवाड यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेट दिली.

स्वच्छतागृहातच कापलेली नाळ व ब्लेड सापडले असून, स्वच्छतागृहातच अनोळखी स्त्रीने या अर्भकास जन्म देऊन तिथेच त्यास सोडून निघून गेली असावा, असा अंदाज वर्तवला आहे. दुकानाच्या सीसीटीव्हीत संशयित महिला निदर्शनास आली असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. याबाबत ज्ञानेश्वर झोरे यांनी पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी अर्भकावर प्राथमिक उपचार केले.

loading image
go to top