सफाई कामगारामुळे वाचले अर्भकाचे प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

newborn baby found in trash life of newborn baby saved by cleaners pune

सफाई कामगारामुळे वाचले अर्भकाचे प्राण

घोरपडी : गावातील आर्मी परिसरातल्या विश्वामित्र मार्गा येथील कचरपेटीत नवजात अर्भक आढळले. सकाळी रस्ते सफाईचे काम सुरू घडताना पुणे बोर्डाच्या सफाई कामगार भाग्यश्री लोंढे यांना कचराकुंडीजवळ लहान बाळ रडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून त्या कचरा कुंडीजवळ गेल्या, त्यावेळी त्यांना एक नवजात अर्भक सफेद रंगाच्या कापडाच्या पिशवीमध्ये ठेवलेले दिसले व ते हालचाल करीत होते. त्यानुसार त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवले. कर्नल विकास सावगावे यांनी सदर नवजात अर्भकास पाहुन कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बोलविले.

डॉक्टरांनी या नवजात बालकासाची तपासणी केली, नुकतेच जन्माला आलेले पुरुष जातीचे बालक असुन त्याची नाळ तशीच ठेवलेली असल्याचे यावेळी आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी बालकाची नाळ तोडून त्यास प्राथमिक उपचार दिले .भाग्यश्री लोंढे यांनी वेळीच त्या बालकला पाहिल्यामुळे त्याचे प्राण वाचले.त्यानंतर वानवडी पोलीस यांना याबाबत माहिती देण्यात आली. वानवडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने नवजात अर्भकास ससून रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक एम . जी . गावडे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Newborn Baby Found In Trash Life Of Newborn Baby Saved By Cleaners Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top