माओवाद्यांमुळेच गरिबी, दारिद्य्राचा प्रश्‍न - डॉ. अभिनव देशमुख

माओवाद्यांमुळेच गरिबी, दारिद्य्राचा प्रश्‍न - डॉ. अभिनव देशमुख

पुणे - ‘‘गडचिरोलीमध्ये गरिबी व दारिद्य्राविरोधात लढा देण्यासाठी माओवादी पुढे आले आहेत, हा विचार जाणीवपूर्वक पसरविला जात आहे. प्रत्यक्षात माओवाद्यांमुळेच गडचिरोलीत गरिबी व दारिद्य्रासारखे प्रश्‍न निर्माण झाले आहेत,’’ असे मत कोल्हापूरचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. 

डॉ. देशमुख यांनी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यानंतर त्यांची नियुक्ती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली. त्यानिमित्त डॉ. देशमुख यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘देशाची राज्यघटना, राजकीय संस्था मान्य नसणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन कारस्थान रचतात. जगभरातील फसलेल्या विचारसरणी गोरगरिबांच्या डोक्‍यात घालून त्यांचा ‘गिनिपीग’प्रमाणे वापर करतात. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने माओवाद्यांविरोधी अभियानाला गती देण्यासाठी त्रिसूत्री निर्माण करून त्यानुसार कार्य करण्यावर भर दिला.’’

माओवाद्यांच्या हल्ल्यात यापूर्वी १९१ पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले आहेत. प्रत्येक अनुभवातील चुका सुधारून नियोजन आखत गेलो. राज्य सरकारचे अद्ययावत तंत्रज्ञान,  उत्कृष्ट प्रशिक्षण आणि दररोजच्या अनुभवांचा मेळ साधून माओवाद्यांविरुद्ध लढायला सुरवात केली. त्यास चांगले यश मिळाले आहे. याबरोबरच गडचिरोली पोलिसांनी सोशल पोलिसिंगद्वारे अनेक चांगले उपक्रम राबविले. त्याची दखल जगभरात  घेतली गेल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

शहरी नक्षलवाद धोकादायक
शहरी व आदिवासी माओवादामध्ये फरक होऊ शकत नाही. मात्र, शहरांमध्ये १९७० पासूनच माओवाद्यांचे जाळे पसरण्यास सुरवात झाली. शिक्षण संस्था, कामगार, सामाजिक संस्था व संघटनांमध्ये स्वतःचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ते कार्यरत राहतात. सरकारविरोधी असंतोष वाढविणाऱ्या घटनांना बळ देतात. शहरांमधील काही बुद्धिजीवी लोक माओवाद्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे शहरी नक्षलवाद अधिक धोकादायक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com