Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

हिंगणगाव ते खामगाव टेक जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या बांधकामात झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जा पडला उघडा.
hingangaon to khamgaon tek bridge collapse

hingangaon to khamgaon tek bridge collapse

sakal

Updated on

- सुनील जगताप

उरुळी कांचन - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) माध्यमातून हवेली तालुक्यातील हिंगणगाव ते खामगाव टेक जोडणाऱ्या नदीवरील पुलाच्या बांधकामात झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जा उघडा पडला आहे. सुमारे २४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा पूल उन्हाळा संपून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या एकाच दिवसाच्या पुराच्या पाण्यात कोलमडून पडला आहे. या निकृष्ट बांधकामाची पाहणी करून शिवसेनेचे युवा नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन यांनी संताप व्यक्त केला व याची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com