राजगड किल्ल्यावरील नुकताच बसविलेला लाकडी पाली दरवाजा कोसळला

किल्ले राजगड वर जाणारा राज मार्गावरील असणाऱ्या पहिल्या पाली दरवाजावर लाकडी दरवाजा (कवाडे) बसवण्यात आला होता.
newly installed wooden Pali gate on Rajgad fort collapsed bappu sable pune velhe
newly installed wooden Pali gate on Rajgad fort collapsed bappu sable pune velhesakal

वेल्हे (पुणे) : किल्ले राजगड (ता .वेल्हे )येथील गडावर जाणाऱ्या मुख्य मार्गावरील पाली दरवाज्यावर नुकताच बसविलेल्या लाकडी दरवाजा (कवाडे) आज सकाळच्या सुमारास कोसळला असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी नसल्याची माहिती किल्ल्याचे पुरातत्व विभागाचे कर्मचारी पहारेदार बाप्पू साबळे यांनी दिली. किल्ले राजगडावर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने वेगवेगळ्या सात ठिकाणी लाकडी दरवाजे (कवाडे) बसवून एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. यामध्ये किल्ले राजगड वर जाणारा राज मार्गावरील असणाऱ्या पहिल्या पाली दरवाजावर लाकडी दरवाजा (कवाडे) बसवण्यात आला होता.

वेल्हे तालुक्यामध्ये अद्यापही मान्सूनच्या पावसाची सुरुवात झाली नसली तरी किल्ले राजगड व तोरण्यावर तुरळक पावसाच्या सरी पडत असून मोठ्या प्रमाणात धुके व जोरदार वारे वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे तसेच शनिवार रविवारी असलेल्या सुट्ट्यांमुळे किल्ल्यावर हजारो पर्यटक दाखल झाले असून आलेल्या पर्यटकांनी फोटोशूटसाठी दरवाज्याची उघडझाप केल्यामुळे किल्ल्याच्या मूळ दरवाज्यांच्या वेळी असलेल्या दगडी ढाच्या तुटल्याने बसविलेला हा दरवाजा आज रविवार (ता.१९ ) रोजी खाली कोसळला असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला असून सुदैवाने यावेळी या ठिकाणी पर्यटक नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पुरातत्व विभागाचे कर्मचारी पहारेदार बाप्पू साबळे यांनी सकाळी किल्ल्यावर आल्यानंतर हा दरवाजा पडलेल्या स्थिती आढळून आल्यानंतर किल्ल्यावरील कर्मचारी आकाश कचरे, विशाल पिलावरे ,दीपक पिलावरे व इतर पर्यटकांच्या साह्याने तो बाजूला करण्यात आला.

दरम्यान किल्ल्यावरील नुकताच बसवण्यात आलेला लाकडी दरवाजा कोसळल्याची बातमी समाज माध्यमांवर पसरली असता शिवशंभु प्रतिष्ठान कात्रज चे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून लाकडी दरवाजा बसवण्याच्या अगोदर शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये ज्या ठिकाणी सागवानी दरवाजे कवाडे बसवण्यात येणार आहेत त्या ठिकाणचे किल्ल्याचे मूळ अवशेष सुस्थितीत आहेत की नाही ?गडाच स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का नाही? येथील अवशेषा शेकडो किलो वजनाचे कवाडे पेलतील का ? असे प्रश्न उपस्थित करत या मजबुतीचा अहवाल माहिती अधिकारात मागविला होता परंतु याबाबत पुरातत्व विभागाने कोणतेही उत्तर न देता ज्या पुरावशेषांवर लाकडी दरवाजा लावला होता ते पुरावशेष कोसळले असून याला सर्वस्वी जबाबदार हे आंधळेपणाने परवानगी देणारे पुरातत्व खाते आहे असे म्हंटले आहे.याबाबत पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com