नवविवाहितांनो, जेजुरीत येताय? थोडे थांबा! 

तानाजी झगडे
शनिवार, 23 मे 2020

लग्नानंतर नवविवाहित परंपरेनुसार कुलधर्म कुलाचार करण्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला येण्याची परंपरा आहे.

जेजुरी (पुणे) : नवविवाहितांनो जेजुरीत येतात थोडे थांबा...मुख्य रस्ता सोडून शहरात गाडी गेल्यास आपली गाडी ताब्यात घेऊन संबंधितावर कारवाई होणार आहे. नवविवाहित जेजुरीत येऊ लागल्याने जेजुरी पोलिसांना याबाबत आवाहन करावे लागले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लग्नानंतर नवविवाहित परंपरेनुसार कुलधर्म कुलाचार करण्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला येण्याची परंपरा आहे. सध्या लॉकडाउनच्या काळातही साध्या पद्धतीने लग्न होत आहेत. मात्र, खंडोबा मंदिर सतरा मार्चपासून बंद आहे. दर्शनासाठी गडावरील सर्व रस्ते बंद आहेत. मात्र, तरीही लग्नानंतर नवविवाहित खंडोबाच्या दर्शनासाठी म्हणून जेजुरीच्या पहिल्या पायरीच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामध्ये रेडझोनमधील चारचाकी वाहने नवविवाहितांना घेऊन येताना दिसत आहेत. 

बाप रे...बंधाऱ्यावरून नदीत कोसळला ट्रक, त्यात होते...  

या प्रकारांमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज जेजुरी पोलिसांनी एक पत्रक काढून जेजुरीत नवविवाहित अथवा दर्शनाच्या उद्देशाने आल्यास संबंधित गाडी ताब्यात घेतली जाईल व संबंधितावर कायदेशीर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी जाहीर केले आहे. 

मुलीकडून प्रेमाचे नाटक, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल  

दरम्यान, मुख्य रस्त्यापासून खंडोबा मंदिराकडे जाणारे रस्ते बंद केले असून, त्यावर पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. मात्र, तरीही नवविवाहितांच्या काही गाड्या नंदी चौकापर्यंत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newlyweds, come to the jury? Wait