esakal | मुलीकडून प्रेमाचे नाटक, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल 
sakal

बोलून बातमी शोधा

crime

प्रकाश व पूजा या दोघांत प्रेमप्रकरण होते. पूजा हिने प्रेमाचे खोटे नाटक केले व फसवून वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेऊन लुबाडले.

मुलीकडून प्रेमाचे नाटक, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल 

sakal_logo
By
हरिदास कड

चाकण (पुणे) : खेड तालुक्‍यातील बिरदवडी येथील प्रकाश पवार या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणी, तिची आई, तरुणीचा प्रियकर व तरुणास उसने दिलेले पैसे मागत असलेला एकजण, अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाप रे...बंधाऱ्यावरून नदीत कोसळला ट्रक, त्यात होते...  

या प्रकरणी प्रकाश पवार याचे वडील पोपट पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूजा दशरथ पवार (वय 19), तारा ऊर्फ लक्ष्मी दशरथ पवार (वय 45, दोघीही, रा. चाकण, खंडोबामाळ, ता. खेड), सनी किसन वाढाणे (वय 32, रा. राजगुरुनगर, ता. खेड), गणेश बाळशिराम शिंदे (वय 32, रा. मोशी, ता. हवेली) या चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार, सहायक पोलिस निरीक्षक पी. के. राठोड यांनी दिली. 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका  

प्रकाश व पूजा या दोघांत प्रेमप्रकरण होते. पूजा हिने प्रेमाचे खोटे नाटक केले व फसवून वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेऊन लुबाडले. त्यातून त्याला पूजा, तिचा प्रियकर सनी वाढाणे, तिची आई तारा ऊर्फ लक्ष्मी दशरथ पवार यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. तसेच, गणेश शिंदे हा प्रकाश याच्याकडे उसने दिलेले पैसे वारंवार मागत होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या चौघांनी त्यास मानसिक त्रास दिला व त्याला जगणे नकोसे केले. त्यातून प्रकाश याने रोहकल फाट्यावर रात्री बारापूर्वी एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने पोलिस कंट्रोल रूमला फोन करून, "मी आत्महत्या करत आहे,' अशी माहिती दिली होती. त्यानंतर पोलिस व नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात या चौघांची नावे आहेत. 
 

loading image