कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत - बाळा भेगडे

रामदास वाडेकर
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

टाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व आमदार बाळा भेगडे यांनी केले. 

टाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व आमदार बाळा भेगडे यांनी केले. 

आंदर मावळातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोरवली येथे झालेल्या सभेत भेगडे बोलत होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सभापती गुलाबराव म्हाळस्कर,उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी उपनगराध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब घोटकुले,किरण राक्षे,संदीप काकडे ,शिवाजी टाकवे, 
सागर पवार ,गणेश गायकवाड,संतोष जांभुळकर,संतोष कुंभार ,मच्छिंद्र दगडे आदि उपस्थितीत परिसरातील काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

भेगडे म्हणाले"देहू तीर्थक्षेत्राचा विकास,तळेगावात बंदिस्त गटारे, रेल्वे भुयारी मार्ग, दलित वस्ती विकास, तळेगाव, लोणावळा, देहूरोड या शहरातील विविध विकास कामे, मावळ पंचायत समिती इमारतीचे विस्तारित काम, ग्रामीण भागातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील उकसानचा रस्ता, महागाईच्या मालेवाडीचा रस्ता, आर्डव फाटा ब्राम्हणोली,कांब्रे कोंडिवडे रस्ता, कातवी वराळे माळवाडी, फळणे फाटा भोयरे ,वाहनगाव ते खांडी रस्ता अशा विविध कामांसाठी मावळ तालुक्यात कोट्यावधी रूपयांचा निधीतून विकासाची गंगा पोहोचवत आहे. 

सभापती गुलाबराव म्हाळस्कर व उपसभापती शांताराम कदम म्हणाले, "वाहनगाव माळेगाव दरम्यान लाॅज सुविधा उपलब्ध करून द्यावा,पर्यटन वाढीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण करावे.टाटाने शेतीसाठी पाणी द्यावे

गोपाळ पिंगळे यांनी स्वागत केले.यदूनाथ चोरघे यांनी प्रास्ताविक केले. गणेश कल्हाटकर यांनी सूत्रसंचालन केले.रामदास आलम यांनी आभार मानले. निवृत्ती वाडेकर, अशोक शेलार, संदीप लष्करी,तुकाराम खोल्लम, किसन शेलार, सुधीर कुडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 

Web Title: For the next twenty-five years BJP is in power - bala bhegde