‘एनजीटी’ला मिळणार आता हक्काची जागा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

पुणे - राष्ट्रीय हरित लवादासाठी (एनजीटी) हवेली तालुक्‍यात खराडी येथे ४५ गुंठे जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या जागेच्या कब्जेहक्काची रक्कम भरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने ‘एनजीटी’ला केल्या आहेत. यामुळे ‘एनजीटी’ला आता हक्काची जागा मिळणार आहे. 

‘एनजीटी’चे पश्‍चिम भागातील खंडपीठ हे पुण्यात स्थापन करण्यात आले आहे. सध्या ‘एनजीटी’चे कामकाज हे विधान भवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीमधून सुरू आहे. ‘एनजीटी’ला स्वतंत्र इमारतीसाठी जागा मिळावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती. सरकारने खराडी येथील सर्व्हे नंबर ८० मधील ४५ गुंठे जागा कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ‘एनजीटी’ला दिली आहे. या मिळकतीच्या कब्जेहक्काची रक्कम ११ कोटी ३८ लाख ४८ हजार रुपये सरकारी तिजोरीत भरण्याचे पत्र जिल्हा प्रशासनाकडून ‘एनजीटी’ला देण्यात आले आहे. ‘एनजीटी’मध्ये पर्यावरणविषयक दावे गुजरात, महाराष्ट्र, गोवासह अन्य राज्यांमधून दाखल होतात. सध्याची जागा अपुरी आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘एनजीटी’साठी जागा देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: NGT place