एल्गार व माओवादी संबंध प्रकरण : कागदपत्रांसाठी एनआयएचा न्यायालयात अर्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणात पुणे पोलिसांनी जप्त केलेले आणि न्यायालयात सादर करण्यात आलेले कागदपत्रे मिळविण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) येथील विशेष न्यायालयात बुधवारी अर्ज दाखल केला आहे.

पुणे : एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणात पुणे पोलिसांनी जप्त केलेले आणि न्यायालयात सादर करण्यात आलेले कागदपत्रे मिळविण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) येथील विशेष न्यायालयात बुधवारी अर्ज दाखल केला आहे.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर एनआयएचे अधिकारी सोमवारी कागदपत्रे घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयात पोहोचले होते. मात्र, कायदेशीर पूर्तता झाल्यानंतरच तपासाची कागदपत्रे देण्यात येतील, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे कागदपत्रे मिळविण्यासाठी एनआयएने बुधवारी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर येत्या सोमवारी (ता. 3) सुनावणी होणार असून, पुणे पोलिसांना, तसेच या प्रकरणातील संशयित आरोपींना त्यावेळी त्यांचे म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा तपास वर्ग करण्याबाबत पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पुणे पोलिसांना अद्याप कुठलेच पत्र मिळालेले नाही. प्रशासकीय प्रक्रियेनुसार तपास वर्ग करण्याचे पत्र मिळाल्यानंतरच हा तपास "एनआयए'कडे वर्ग होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आता एनआयएने न्यायालयाचा आधार घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIA application to court for documents In Elgar Case