पुण्यात ISIS चे हस्तक? कोंढव्यात तत्काळ सर्च ऑपरेशन

ISIS
ISIS

आज एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणेने तलहा खान यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. पुण्यातील कोंढवा परिसरात हे सर्च ऑपरेशन पार पडलंय. रात्रीपासून राष्ट्रीत तपास यंत्रणेचे अधिकारी पुण्यात दाखल होते. (NIA in Pune) NIA च्या काही सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.

ISIS
यासीन भटकळच्या वकिलाला ‘इसिस’ची धमकी

ओखला विहार, जामिया नगर येथील काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीच्या लोधी पोलिसांच्या स्पेशल सेलने यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पुण्याशी संबंधित पुरावे सापडल्याने पोलिसांनी तत्काळ महाराष्ट्रातील पोलिसांशी संपर्क साधला.

त्यानुसार पुण्यात केंद्रीय तपास यंत्रणेचं पथकही दाखल झालं होतं. पुण्यातील काही मुस्लीम तरुणांना विघातक कृत्यासाठी तयार करण्यात येत असल्याचं यामध्ये समोर आलंय. कोंढवा परिसरातील काही तरुणांच्या घरात महत्वाचे पुरावे सापडल्याचं निदर्शनास आलंय.

तपासादरम्यान, अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दिक खत्री आणि अब्दुर रहमान डॉ. ब्रेव्ह या 4 आरोपींना अटक करण्यात आली. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारधारा पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे हे प्रमुख आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय संघटनेसाठी निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, बनवणे या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आयईडी आणि टार्गेट किलिंग चालवा, असे आदेश त्यांना देण्य़ात आले होते. आज संशयित तलहा खान याच्या आवारात घेतलेल्या झडतीत विविध गुन्हे दाखले आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com