मुलांना रंगकाम, मातीकामाचे धडे !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुणे - रंगकाम, मातीकाम, कथाकथन, पर्यावरणाविषयीची माहिती जाणून घेण्यात आज (ता. १६) मुले रंगली. निमित्त होते कार्यशाळेचे. या कार्यशाळेमध्ये मानसी महाजन यांनी ओएचपी शीटवर विविध रंगांच्या माध्यमातून ‘ग्लास पेंटिंग व पेपर क्विलिंग’च्या माध्यमातून शोभिवंत टी लाइट होल्डर बनविण्याचे धडे मुलांना दिले.  

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत ‘उन्हाळी सुटीतील धमाल’ ही कार्यशाळा बुधवार पेठेतील सकाळ कार्यालयात आयोजिली होती. 

तसेच बारामती येथील घनश्‍याम केळकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत अरेबियन कथा सादर केल्या. यामध्ये सिंदबाद व त्याच्या सागर सफरींचा थरारक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच हरिभाऊ कर्डेकर यांनी चाकावर तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यांची प्रात्याक्षिक सादर केली. त्यांनी सादर केलेल्या या आगळ्या-वेगळ्या प्रात्याक्षिकाला विद्यार्थ्यांनीही भरभरून दाद दिली. यामध्ये त्यांनी सुगड, माठ, पणती व मातीचे विविध आकार साकारले. तसेच पक्षीतज्ज्ञ अनुज खरे यांनी पक्षी, प्राणी व जंगलाची सफर दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिली. त्यामध्ये प्रात्यक्षिकासह विविध कलाकृती स्वत: केल्याचा आनंद मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एम-टेक इंजिनिअर्सचे मनीष कोल्हटकर व मंदार किराणे कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक होते.

Web Title: NIE program for children