बिजलीनगरमध्ये अतिक्रमणे जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

निगडी - प्राधिकरणाने अतिक्रमणांविरोधात कारवाई सुरू ठेवली असून शुक्रवारी (ता. २६) बिजलीनगर येथील अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

वाल्हेकरवाडीतील बिजलीनगर येथे प्राधिकरणाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही कारवाई केली. सर्व्हे नंबर ५७ (शिवनगर) येथील सोळाशे चौरस फूट तसेच समर्थ कॉलनी येथील एकवीसशे चौरस फूट बांधकाम पाडले. आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ आठशे चौरस फुटांचे दुकान गाळेही पाडले. साधारणपणे साडेचार हजार चौरस फूट बांधकाम या कारवाईत पाडले गेले. प्राधिकारणाने विविध भागांत सलग अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

अतिक्रमण विरोधी पथकाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता आर. ए. कोकणे, शाखा अभियंता डी. आर. कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: nigadi pune news crime on encroachment