भक्ती-शक्ती चौकात डौलाने फडकणार तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

निगडी - देशातील सर्वांत उंच ध्वजस्तंभ (१०७ मीटर) असा दावा करण्यात येत असलेल्या ध्वजस्तंभावर प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकणार आहे. ध्वजवंदनाची तांत्रिक तपासणी शुक्रवारी (ता. १९) यशस्वी झाली.

निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात १०७ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. महापालिकेने उभारलेला हा ध्वजस्तंभ भारतातील सर्वाधिक उंच असल्याचा दावा आहे.

या ध्वजस्तंभावर प्रजासत्ताकदिनी तिरंगा डौलाने फडकणार आहे. नव्याने उभारलेल्या या स्तंभावर तिरंगा फडकविण्यापूर्वी आज तांत्रिक बाबी यशस्वीपणे तपासल्या. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शर्मिला बाबर, सुमन पवळे, सचिन चिखले, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, उपअभियंता अनिल शिंदे उपस्थित होते.

Web Title: nigdi pune news big tiranga flag in nigdi