सुनावलेल्या शिक्षेपेक्षाही अधिक काळ तुरुंगात होते नायझेरियन गुन्हेगार

Nigerian criminals were jailed for longer than sentenced
Nigerian criminals were jailed for longer than sentenced

पुणे : तरुणीला 38 लाख रुपयांचा गंडा घातला म्हणून न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेपेक्षा अधिक काळ कारावास भोगलेल्या तिघा नायझेरियन गुन्हेगारांची न्यायालयाने सुटका केली आहे. तर त्यांना झालेला दंड भरण्यासाठी न्यायालयाने दोन महिन्याची मुदत दिली आहे.ओगेयुरी इम्मनुल चिनासो, ओसारामेनसे समार्ट आणि टोपे ओलूओले अशी त्या तिघांची नावे आहेत.

हिणीकडून अभ्यास करून घेतल्याने शिक्षिकेने केली विद्यार्थ्याला बेदम मारहाण 

मॅट्रिमोनी साईटवरून चतु:श्रृंगी परिसरातील तरुणीला ऑनलाइन 38 लाख रुपयांचा गंडा घालता म्हणून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. राणे यांनी त्यांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तिघांना अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार होता. दंड भरण्यासाठी त्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र तिघेही तीन वर्ष सात महिने आठ दिवस तुरुंगात होते. 2015 झालेल्या या प्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास सायबर सेलने केल्यानंतर नायजेरियन व्यक्तींनी फसवणूक केल्याचे आढळून आले होते. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, 10 मोबाईल, 20 सिमकार्ड, आठ डोंगल मिळाले होते.

पुणे : सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

तिघांनी अद्याप दंड भरलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर त्यांना सोडायचे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने पुढील आदेश करण्याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक पी. जे. जगताप यांनी न्यायालयात पत्राद्वारे सांगितले. यावर न्यायालयाने तिघांना सोडायचा आदेश दिला. त्यानुसार त्यांना सोडण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे. शिक्षेपेक्षा जास्त दिवस त्यांना तुरुंगात ठेवले म्हणून नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी करणार असल्याचे बचाव पक्षाचे वकील  अॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com