
Officials initiate an inquiry into the agent who allegedly helped convict Nilesh Ghaywal secure a passport while he is still serving his jail term.
esakal
Nilesh Ghaywal passport case, agent inquiry : कुख्यात गुंड नीलेश घायवळला पासपोर्ट काढण्यासाठी लागणारे कागदपत्र, प्रतिज्ञापत्र मिळून देण्यासाठी आमिरउल्ला हबीबुल्ला चौधरी या एजंटने मदत केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. यानुसार आता त्याची चौकशी होणार आहे. शिवाय त्याच्याविरोधात पाच गुन्हेही दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळने २०२० मध्ये तत्काळ स्वरूपाचा पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्याने आधार कार्डसह काही इतर कागदपत्र सादर केली होती. तसेच आपल्यावर कुठलाही गुन्हा नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुद्धा पोलिसांना दिले होते. या सर्व प्रक्रियेत एजंट चौधरीने घायवळला मदत केली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
चौधरी हा मूळचा पिंपरी चिंचवड शहराचा रहिवासी असून काही दिवस तो पुणे शहरातील वारजे भागात वास्तव्यास होता. त्यावेळी त्याची निलेशशी ओळख झाली होती. दरम्यान, त्याने निलेश याला पासपोर्टसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्र आणि प्रक्रियेची माहिती दिल्याचा संशय पोलिसांना आहे. चौधरी याच्यावर पुणे शहरातील कोथरूड, उत्तमनगर, वारजे आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कोथरुड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर समाजात भीती पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे घायवळ सध्या फरार आहे. पुणे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.