

Nilesh Lanke Health Update pune ruby hall doctor statement
esakal
MP Nilesh Lanke Viral Fever : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ८) त्यांना वैद्यकीय तपासणी आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.