निमसाखरच्या ग्रामसेवकाला दहा हजार रुपयांचा दंड.

राजकुमार थोरात 
शनिवार, 26 मे 2018

वालचंदनगर : निमसाखर (ता.इंदापूर) येथील ग्रामसेवक भगवान श्रीमंत घोगरे यांनी माहिती अधिकाऱ्यातील माहिती न पुरविल्याबद्दल त्यांना पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी दहा हजार रुपये शास्ती (दंड) लावला असून दंडाची रक्कम घोगरे यांच्या वेतनामधून कताप करण्याचा आदेश दिला आहे.

निमसाखर येथील अरुण शंकर भोसले यांनी (५ मे २०१६) निमसाखर ग्रामपंचायतीकडे मार्च ते एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची व एप्रिल २०१६ मधील मासिक सभेचा अजेंडा, सभेला उपस्थित असणाऱ्यांची नावे, रजिस्टर व प्रोसेडिंगची माहिती माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागविली होती. सदरची माहिती न मिळाल्याने भोसले यांनी प्रथम अपिलीय अधिकारी किरण मोरे यांच्या अपिल केले होते. मोरे यांनी (२३ जुन २०१६) सुनावणी घेवून चार दिवसामध्ये माहिती पुरविण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही घोगरे यांनी माहिती न दिल्यामुळे भोसले यांनी (२२ सप्टेंबर २०१६) राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिल केले. या अपिलाची सुनावनी (२८ मार्च २०१८) झाली.

यामध्ये घोगरे यांनी भोसले यांना माहिती न पुरवून माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवून अधिनियमातील तरतुदीनूसार त्यांच्यावर दहा हजार रुपयांची शास्ती (दंड) लावला असून दंडाची रक्कम घोगरे यांच्या वेतनामधून कपात करण्याचा आदेश पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिला आहे. तसेच घोगरे यांनी भोसले यांना आदेश मिळाल्यानंतर एक आठवड्याच्या आत माहिती विनामुल्य उपलब्ध करुन द्यावी असे सांगितले आहे. सदरचा आदेश नुकताच प्राप्त झाल्याचे भोसले यांनी सांगितले आहे.

Web Title: nimasarkha gramsevak gets fine of Rs 10,000