जुन्नरमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, एकाच दिवसात सापडले एवढे रुग्ण 

दत्ता म्हसकर
मंगळवार, 30 जून 2020

जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नव्याने पाठविलेल्या १३ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत असताना प्रथमच एकाच दिवशी

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील पाच गावांतून एकाच दिवशी सोमवारी (ता. ३०) एकूण नऊ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.  

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका डॉक्टर महिला व तिच्या कुटुंबतील दोघे, उंब्रज नंबर एक येथे एक, उंब्रज नंबर दोन येथे ३, तर नेतवड व आर्वी पिंपळगाव येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ६८ झाली आहे. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत, तर ३४ जण उपचार घेत आहेत. औरंगपूर व मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नव्याने पाठविलेल्या १३ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत असताना प्रथमच एकाच दिवशी नऊ रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. ओतूरचे पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पोलीस ठाण्यातील त्यांच्या संपर्कातील २३ पोलिस कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे ओतूर पोलिसांनी सुस्कारा सोडला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

जुन्नर तालुक्यातील गावनिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे : डिंगोरे- १  (बरा), सावरगाव- ५ (बरे), मांजरवाडी- २ (बरे), पारुंडे- ३ (बरे), आंबेगव्हाण- २ (बरे), धोलवड- ३ (बरे), धालेवाडीतर्फे मिन्हेर- १ (बरा), विठ्ठलवाडी वडज- १ (बरा), शिरोलीतर्फे आळे- २ (बरे), खिलारवाडी- १ (बरा), कुरण- १ (बरा), चिंचोली- ३ (बरे), ओतूर- २ (बरा), जुन्नर- १ (बरा), राजुरी- १ (बरा), नवलेवाडी- १ (बरा), धामणखेल- १ (बरा), कुसूर- १. मृत्यू : औंरगपूर- १ (मृत्यू),  मोकासबाग- १ (मृत्यू), एक्टिव्ह : बोरी- ३, खामुंडी- ७, खानापूर- ३, शिरोली खुर्द- ३, उंब्रज नंबर एक- १. धनगरवाडी - १, ओतूर- १, वारूळवाडी- १, विठ्ठलवाडी- १, संतवाडी- १, वारुळवाडी- १, जुन्नर- १, निरगुडे- १, उंब्रज नंबर एक- १, उंब्रज नंबर दोन- ३, पिंपळवंडी-३, नेतवड- १, पिंपळगाव आर्वी- १. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine patients of Corona were found in a single day in Junnar taluka