इंदापूरवर मोठे संकट, एकाच दिवसात 40 जणांच्या अहवालात...

डाॅ. संदेश शहा
Tuesday, 16 June 2020

इंदापूर शहरातील एक मध्यमवयीन महिला व पुरुष कोरोनाबाधीत असल्याचे आढळले होते. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 40 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरातील 40 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील नऊ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

पुरंदरमध्ये एकाच दिवसात सापडले तीन कोरोनाबाधित

इंदापूर शहरातील एक मध्यमवयीन महिला व पुरुष कोरोनाबाधीत असल्याचे आढळले होते. दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 40 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी महिलेच्या थेट संपर्कात आलेले नऊ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर इंदापूर येथील कोरोना केअर केंद्रात औषधोपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

इंदापूर शहरातील कसबा परिसरात राहणारी संबंधित महिला 12 जून रोजी सकाळी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच दिवशी दुपारी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण कोरोनाबाधीत असल्याचे दिसून आले होते. एकाच दिवशी दोन रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच, शहरातील संबंधित प्रभाग सील करण्यात आले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या रुग्णांना फ्ल्यूसारखी लक्षणे आढळून येत आहेत, त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine people in Indapur city have been diagnosed with corona