नऊ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अतिप्रसंग

डॉ. संदेश शहा
Tuesday, 11 August 2020

इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील नऊ वर्षांच्या मुलीवर गावातील अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केला. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील नऊ वर्षांच्या मुलीवर गावातील अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केला. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन इंदापूर न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (ता.  ८) त्या चारा आणण्यासाठी नदीकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती त्यांच्या कामाला गेले होते. तर,पीडित मुलगी घराजवळ शाळेच्या पटांगणात सकाळी १० वाजता खेळत होती. दुपारी तीन वाजता फिर्यादी महिला चारा घेऊन घरी आली. त्यावेळी मुलगा एकटाच होता. त्याने बहिण शाळेच्या पटांगणात खेळत असून, वडिल तिला आणण्यासाठी गेले, असे सांगितले. 

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

थोड्या वेळाने फिर्यादीचे पती मुलीला घेऊन घरी आले. त्यांनी सांगितले की, मुलगी शाळेच्या पटांगणात खेळत असताना आरोपीने तेथे आला. त्याने मुलीच्या हाताला धरून तिला आपल्या घरी नेले. या वेळी मुलीने हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. त्याने तिच्या गालावर चापट मारून तिच्यावर अतिप्रसंग केला. घरी आल्यानंतर मुलगी पोटात दुखत आहे, असे म्हणून रडू लागली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सर्व माहिती दिली. याबाबतचा पुढील तपास फौजदार सुशील लोंढे हे करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A nine-year-old girl was tortured by a minor in Indapur taluka