पवना धरणामध्ये 90 टक्‍के साठा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पवनानगर - पवना धरण 90 टक्के भरले असून, पाण्याचा विसर्ग कधी सुरू करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोमदार पावसामुळे धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे रविवारी (ता. 22) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 89.50 टक्के पाणीसाठा झाला, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी दिली. 

धरण 90 टक्के भरल्यामुळे संपूर्ण वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा व शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणात पन्नास टक्‍के साठा झाला होता. पाऊस जास्त झाला असता, तर आतापर्यंत धरण शंभर टक्के भरले असते. सध्या धरण क्षेत्रामध्ये दिवसभरामध्ये 56 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, 215.86 दशलक्ष घनमीटर (7.62 टीएमसी) पाणीसाठा झाला. वर्षभरामध्ये 2024 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत पवना धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 

Web Title: Ninety percentage of the reserves in Pawana dam