‘नीरा’, ‘गुंजवणी’चे शिल्लक पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

आठ तालुक्‍यांना लाभ
या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील नीरा डावा कालव्यावरील पुरंदर, बारामती व इंदापूर या तालुक्‍यांतील शेतीला व अवर्षण भागाला रब्बी व उन्हाळा हंगामासाठी भाटघर व वीर धरणातील १०.१०५ टीएमसी, नीरा देवघर व गुंजवणी धरणातील शिल्लक ५.१६६ टीएमसी असे १५.२७१ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. तर नीरा उजवा कालव्यावरील खंडाळा, फलटण व माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्‍यांतील शेतीला भाटघर व वीर धरणातील २२.८०५ टीएमसी, तर नीरा देवघर व गुंजवणी धरणांतींल शिल्लक ४.१८१ टीएमसी असे २६.९८६ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे.

पुणे - नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाणीवाटप करताना प्रकल्पाची मूळ गरज भागवून शिल्लक राहणारे पाणी तात्पुरत्या स्वरूपात नीरा डावा व नीरा उजवा कालव्याद्वारे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

नीरा देवघर व गुंजवणी धरणातील पाणीवाटपासंदर्भात गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यावरून आलेल्या उलट-सुलट वृत्तावरून जलसंपदा विभागाने पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या धरणातील शिल्लक राहणारे पाणी सिंचनासाठी नीरा डावा कालव्यातून ५५ टक्‍के तर, नीरा उजवा कालव्यातून ४५ टक्‍के या प्रमाणात वाटप होणार आहे. पाणीवाटपाचा हा निर्णय घेताना कुठल्याही एका तालुक्‍याचा किंवा भागाचा विचार केलेला नाही अथवा दुजाभाव केलेला नाही. न्यायालयाचा आदेश व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातील तरतुदीनुसार समन्यायी पाणीवाटप तत्त्वाचा विचार करण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक हिताचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेतला असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. 

पुणेकर ओढतात रोज सात सिगारेटचे झुरके ! 

नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे होईपर्यंत विनावापर शिल्लक राहणारे पाणी समन्यायी वाटप करण्याचे तत्त्व लागू राहणार आहे. यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल. तसेच राज्याच्या पाणीपट्टी महसुलात वाढ होणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्याला रोज पुरेसे पाणी मिळणार का? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nira gunjawani dam balance water distribute decision