Nirgudsar News : १७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

वळती (ता. आंबेगाव) येथील सोहम संतोष जुंदरे (वय-१७) या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवार (ता. ०६) रोजी घडली आहे.
Soham Jundare
Soham Jundaresakal

निरगुडसर - वळती (ता. आंबेगाव) येथील सोहम संतोष जुंदरे (वय-१७) या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असल्याची घटना मंगळवार (ता. ०६) रोजी घडली आहे. याबाबत भाऊ जुंदरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली असून मंचर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वळती येथील अजाबपट्टी येथे फिर्यादी भाऊ जुंदरे हे मंगळवार (ता. ०६) रोजी घरी असताना त्यांची चुलत भाऊजई संगीता संतोष जुंदरे यांनी मुलगा सोहम हा घरामध्ये नाही असे सांगितले. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळुन आला नाही.

सर्वांनी परिसरात शोध घेतला शेवटी घराजवळील विहिरीमध्ये पाहिले असता विहिरीच्या पाण्यावर चप्पल तरंगताना दिसली. त्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता सोहम पाण्यात मिळून आला. त्याला विहिरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेले असता डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले.

याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक फौजदार डावखर करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com