Nirgudsar Leopard News : निरगुडसरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Pune News : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील नहयारमळा परिसरात सायंकाळी सात वाजताच बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाने पाहणी करून बिबट मादी व पिल्लाचे ठसे आढळल्याची माहिती दिली.
Nirgudsar Leopard News

Nirgudsar Leopard News

Sakal

Updated on

निरगुडसर : सात वाजताच बिबट्या घराच्या उंबऱ्यावर येत असल्याने सर्वांना सातच्या आत घरात म्हणण्याची वेळ आली आहे.निरगुडसर(ता.आंबेगाव)येथील नहयारमळा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे,रविवार (ता.१९) रोजी रात्री सात वाजता बिबट्या सुनील भेके यांच्या घराजवळ येऊन रस्ता ओलांडून उसाच्या शेतात पसार झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com