पिंपळे सौदागर येथे निर्मल दिंडीचे आयोजन

मिलिंद संधान
सोमवार, 9 जुलै 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागर येथील लोकमान्य हास्य क्लब व निर्मला कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हास्य क्लबचे सभासद, गृहनिर्माण सोसायट्यांमधिल नागरिक व शालेय विद्यार्थी यात सहभागी झाले होते. 

यावेळी नागरिकांनी विठ्ठल रूक्मिणीची वेषभुषा परिधान करून निर्मल दिंडीतून नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शालेय विद्यार्थ्यांनी निर्मल भारत, निर्मल राज, निर्मल गाव व निर्मल परिसर याला अनुसरून घोषवाक्ये लिहलेली पताका आणल्या होत्या. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, संजय कुटे, विजय पाटील, जयनाथ काटे, सुभाष देसाई, दिपक मिरासे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 
 
Web Title: nirmal dindi in pimpale saudagar