

Navale Says Use Of Money And Drugs Hurt More Than Defeat
Esakal
कारेगावच्या निर्मला शुभम नवले यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत कारेगावमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्यांचा ३०० मतांनी भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी पराभव केला. पराभवानंतर आता निर्मला नवले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर झाला, याशिवाय दारू आणि ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीत पैसा जिंकला माणूस हरला पण माझा लढा सुरूच राहील असंही निर्मला नवले यांनी म्हटलं.